हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. येत्या १२ नोव्हेंबररोजी ६८ जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. तसेच भाजपाकडून उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदीही सभा घेणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप यांनी दिली आहे.

हेही वाचा – Himachal Pradesh Elections : हिमाचल प्रदेश निवडणूक भाजपासाठी आव्हानात्मक? विधानसभेचे तिकीट नाकारल्यानंतर अनेकांचा अपक्ष लढण्याचा निर्णय

कसा असेल पंतप्रधान मोदींचा दौरा?

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान शिमला, हरीमपूर, कांग्रा, मंडी याठिकाणी सभा घेतील. तसेच पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य सिंधीया, स्मृती इराणी, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रादेखील सभा घेणार आहेत.

हेही वाचा – हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकीची धूम, पण ‘चहावाल्या’ची होतेय खास चर्चा, भाजपाने दिली उमेदवारी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंडखोर उमेदावारांना भाजपाची धमकी

भाजपाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर अनेक उमेदवारांनी पार्टी सोडण्याचा तर काहीही अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, ज्या उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना भाजपाकडून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप यांनी म्हटले आहे. तसेच त्यांना निलंबित करण्याची वेळ येणार नाही, त्यापूर्वीच ते उमेदवारी मागे घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.