संतोष प्रधान

शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने पवार घराण्यातील आणखी एक नेतृत्व राजकीय प्रमाणेच क्रीडा क्षेत्रातही चमकू लागले आहे.

शरद पवार यांनी क्रिकेट, कब्बडी, खो खो, कुस्ती अशा विविध क्रीडा संघटनांचे अध्यक्षपद भूषविले. अजित पवार हे राज्य ऑलिम्पिक आणि कब्बडी संघटनांचे अध्यक्षपद भूषवित आहेत. आता रोहित पवार यांच्याकडे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची सूत्रे हाती आली आहेत. पवार घराण्यातील स्वत: शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे हे खासदार, अजित पवार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तर रोहित पवार हे आमदार आहेत. यापैकी सुप्रिया सुळे वगळता तिघे विविध क्रीडा संघटनांमध्ये सक्रिय आहेत.

हेही वाचा… बच्‍चू कडूंची वेगळी चूल दबावासाठी?

हेही वाचा… बिहारमध्ये सुरू, महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना होणार का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारामती कर्मभूमी असलेल्या रोहित पवार यांन २०१९ची विधानसभा निवडणूक लढविण्याचे डोळ्यासमोर ठेवूनच नगर जिल्ह्यातील कर्जत- जामखेड मतदारसंघावर लक्ष आधीपासूनच केंद्रित केले होते. त्या भागात दौरे करून मतदारसंघाचा अभ्यास केला. लोकांचे प्रश्न सोडविण्याकरिता पुढाकार घेतला होता. त्याचा त्यांना निवडणुकीत फायदा झाला. भाजपचे राम शिंदे कॅबिनेट मंत्री असतानाही रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला होता. आमदार म्हणून निवडून आल्यापासून मतदारसंघातील विविध प्रश्न सोडविण्यावर रोहित पवार यांनी भर दिला. कर्जत जामखेडमधील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात विविध योजना मंजूर करून घेतल्या आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राम शिंदे यांना भाजपने विधान परिषदेची आमदारकी देऊन रोहित पवार यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.