सुहास सरदेशमुख

सिल्लोड येथील कृषी, कला व क्रीडा महोत्सवातील ‘वसुली वाद’ हा विरोधकांनी घडवून आणला असून गेल्या विधिमंडळ अधिवेशनातील अर्ध्यापेक्षा अधिक कामकाजात टीकेच्या केंद्रस्थानी असल्याने आता ‘अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्ता’ ही पूर्वीची प्रतिमा बदलून ‘नेते पद’ मिळत असल्याची भावना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली. महोत्सवातील वादावर पांघरुण घातले जावे अशा पद्धतीने ‘ मुख्यमंत्र्यांच्या घरातील चर्चा फुटतातच कशा’ असा नवा सवाल उपस्थित करत आपल्याच पक्षातील नेते आपली बदनामी घडवून आणत असल्याचा त्यांनी आरोप केला होता. त्या नेत्याचे नाव घेणार नाही. मुख्यमंत्र्यांना त्या नेत्याविषयी सारे माहीत असल्याचे रविवारी त्यांनी सांगितले.

हेही वाचा… बाळासाहेबांच्या शिवसेनेतील धुसफूस चव्हाट्यावर

कृषी, कला व क्रीडा महोत्सवासाठी अधिकाऱ्यांना तिकिट विक्री करुन निधी गोळा करण्याचे आदेश कृषी मंत्री सत्तार यांनी दिल्यानंतर कृषी अधिकारी हैराण होते. या प्रश्नाचा वाचा फुटल्याने मंत्री सत्तार टीकेच्या केंद्रस्थानी आले. याच काळात धुळे जिल्ह्यातील गायरानाचा प्रश्नही माध्यमांमध्ये चर्चेत आला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकाच्या टीकेला सामाेरे जावे लागले. राजकीय पटलावर विधिमंडळात सत्तार यांचे समर्थन करावे लागले. मुख्यमंत्री शिंदे हे सत्तार यांच्या आमंत्रणाचा मान राखून तसेच कृषी विभागाचाच महोत्सव असल्याने या कार्यक्रमास येतील असे मानले जात होते. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले तर सत्तार यांना राजकीय बळ दिल्याचा संदेश जाईल असे मानले जात होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे येतील का, याविषयीच्या चर्चा सुरू होत्या. त्यांनी महोत्सवाला हजेरी लावली नाही. पण भाजपचे दोन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व डॉ. भागवत कराड यांच्यासह सहकार मंत्री अतुल सावे यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटनास आवर्जून हजेरी लावली. त्यामुळे सत्तार यांना सरकारचे बळ असल्याचा संदेश देण्यात ते यशस्वी ठरले.

हेही वाचा… निवडणुकांचे वर्ष 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या घरातील चर्चा बाहेर कशा फुटतात, या प्रश्नावरुन सत्तार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबतची वस्तुस्थिती चार महिन्यापूर्वीची आहे. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आणि मंत्री सत्तार यांच्यातील शाब्दिक चकमकीचा संदर्भ असल्याचे सांगण्यात येत आहे. काही महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेचा संदर्भ देत महोत्सवाच्या आदल्या दिवशी त्यावरुन सत्तार यांना औरंगाबाद येथील एका आमदारास टीकेचे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. या आमदारांचे नाव मात्र त्यांनी घेतले नाही. या महोत्सवास मुख्यमंत्री येतात, एमआयएमचे खासदार इत्मियाज जलील येतात पण शिंदे गटाचे एक आमदार संजय शिरसाठ हे गैरहजर का असे विचारले असता सत्तार यांनी शिरसाठ हे चांगले मित्र असल्याचे सांगत या विषयाला पुढे वाढू दिले नाही.