पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ४८९ रुग्ण आढळल्याने १ लाख ५६ हजार ६६३ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ३ हजार ९४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ६८१ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ४२ हजार ३६९ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २३३ करोना बाधित रुग्ण आढळले असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४७२ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांचा एकूण संख्या ८५ हजार ११४ वर पोहचली असून पैकी ८० हजार ७५२ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार २०९ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.