News Flash

पुण्यात आज करोनाचे ३२८ नवे रुग्ण, तर पिंपरीत १६३ रुग्ण

पुण्यात करोनामुळे दिवसभरात १८ रुग्णांचा मृत्यू तर पिंपरीत चार जणांचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ३२८ रुग्ण आढळल्याने १ लाख ६२  हजार ४१९  एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ४ हजार २९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ३१६ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ५२ हजार ४८५ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १६३ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, १०५ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८८ हजार २९१ वर पोहचली असून पैकी ८४ हजार ९५० जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ८१७ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 9:03 pm

Web Title: 328 new corona cases in pune and 163 cases in pimpri scj 81 svk 88 kjp 91
Next Stories
1 VIDEO: “तुझ्या अंगावर वर्दी आहे म्हणून…,” पुण्यात भररस्त्यात तरुणाची पोलिसांना शिवीगाळ, कॉलरही पकडली
2 पुण्यातील ‘अंघोळीच्या गोळी’ची अमेरिकन नागरिकांनी घेतली दखल; निमित्त ठरले ट्रम्प
3 पुणे परिसरातील कंपन्या पूर्वपदावर
Just Now!
X