News Flash

पुण्यात करोनाचे ३२८ नवे रुग्ण, पिंपरीत ११ जणांचा मृत्यू

पिंपरीत २०१ नव्या करोना रुग्णांची नोंद

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ३२८ रुग्ण आढळल्याने १ लाख ५७ हजार ९५९ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ४ हजार २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ९०४ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ४५ हजार ३३६ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २०१ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून ११ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, ३३४ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या ८५ हजार ८५० वर पोहचली असून पैकी ८२ हजार ११८ जण करोनातून बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ४६१ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 8:47 pm

Web Title: 328 new corona cases in pune and 201 new cases in pimpri scj 81 svk 88 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धक्कादायक! पुण्यात घरगुती वादातून आजारी व्यक्तीला जिवंत जाळलं
2 “उद्धव ठाकरेंनी फडणवीसांसारखा दौरा करु नये”
3 चोराला पकडण्यासाठी पिंपरी पोलिसांनी लढवली शक्कल, तरुणीच्या नावे फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि…
Just Now!
X