पुणे शहरात दिवसभरात ३५५ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ७१ हजार ५२ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान सात रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ४७८ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान ३७८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ६१ हजार २१० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १६५ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून २५९ जण करोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात नऊ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९२ हजार ९३९ वर पोहचली असून पैकी ८९ हजार २३१ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ८११ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.