महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि भारतीय जैन संघटनेतर्फे राबवण्यात आलेल्या फटाकेमुक्त दिवाळी अभियानात पुण्यातील विद्यार्थ्यांनी फटाके उडवण्यात कपात करून तब्बल ४ कोटी रुपयांची बचत केल्याचा दावा महाराष्ट्र अंनिसने केला आहे.
या अभियानाचा सांगता समारंभ सोमवारी झाला. या वेळी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या हस्ते अभियानात सहभागी झालेल्या शाळांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या उपक्रमात पुण्यातील पन्नासहून अधिक शाळांमधील सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांनी कमी फटाके उडवण्याचा संकल्प केला होता.
समितीचे अध्यक्ष माधव गांधी, कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी, शालिनी ओक, उदय कदम, दीपक गिरमे, शशिकांत मुनोत, नीता शहा, आशा ठक्कर, संतोष भन्साळी, विजय पारख या वेळी उपस्थित होते.