महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी चिटणीस आणि गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दामोदर चिंतामण गोखले (वय ७९) यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
गोखले जून १९८५ ते १९९४ या कालावधीत मएसोच्या चिटणीसपदी कार्यरत होते. १९८५ ते नोव्हेंबर १९९५ या काळात ते गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. १९८३ ते १९९५ या काळात आयएमसीसीचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. बारामतीतील म.ए.सो. विद्यालयाच्या ‘महामात्र’ पदीही ते कार्यरत होते. गोखले यांनी संस्थेमध्ये विविध पदांवर काम केले आहे. १९६९ पासून ते संस्थेचे आजीव सदस्य होते. निवृत्तीनंतरही संस्थेच्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता.
संग्रहित लेख, दिनांक 27th Mar 2014 रोजी प्रकाशित
म.ए.सो.चे माजी चिटणीस दा. चिं. गोखले यांचे निधन
म.ए.सो.चे माजी चिटणीस आणि गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दामोदर चिंतामण गोखले (वय ७९) यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले.

First published on: 27-03-2014 at 02:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: D c gokhale is no more