News Flash

अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी पुण्यात भाजपाकडून महाआरती

भाजपाच्यावतीने पुण्यातील ग्रामदैवत कसबा गणपतीसमोर वाजपेयींच्या प्रकृती स्वास्थासाठी महाआरती करण्यात आली.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती ठीक ठीक व्हावी यासाठी पुण्यात आज (मंगळवार) भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी ग्रामदैवत कसबा गणपती समोर महाआरती केली.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. ते लवकर बरे व्हावेत म्हणून पुण्यात आज (मंगळवार) भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी ग्रामदैवत कसबा गणपती समोर महाआरती केली. यावेळी पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

अटलबिहारी वाजपेयी यांना सोमवारी दिल्लीमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्स रूग्णालयात दाखल झाले होते. वाजपेयींना चांगले आयुष्य लाभो यासाठी पुणे शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीसमोर पुणे भाजपाच्यावतीने योगेश गोगावले यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी नगरसेवक राजेश येनपुरे, अजय खेडेकर, पुष्कर तुळजापूरकर तसेच आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 10:20 pm

Web Title: maha arati in pune from bjp for former pm atal bihari vajpayees health
Next Stories
1 पवारांनी पुणेरी पगडी नाकारणे म्हणजे पुणेकरांचा अपमान: संजय राऊत
2 जाणून घ्या पुणेरी पगडीचा इतिहास
3 पुणे : चालत्या एसटीत तरुणाची हत्या, अश्लील फोटो व्हायरल प्रकरण
Just Now!
X