News Flash

पुण्यात भामा खेड प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या वेळी भाजपा-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा

पुणे महापालिकेच्या भामा आस खेड प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आधी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पुणे शहराची ताकद गिरीश बापट अशा घोषणा भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. या घोषणांना उत्तर म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दादा-दादा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात कार्यक्रम होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाच्या आधी भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 7:07 pm

Web Title: proclamation of bjp ncp workers in pune scj 81 svk 88
Next Stories
1 पिंपरीत नववर्षाची सुरुवात वाहन तोडफोडीने; कोयत्याने वाहनांची तोडफोड
2 “…मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय,” नियंत्रण कक्षात फोन करणाऱ्या पुणेकरांना आश्चर्याचा धक्का
3 करोनानंतर फार मोठा बदल होईल असं वाटत नाही – प्रकाश आंबेडकर
Just Now!
X