जागतीक मराठी अकादमी आणि बीव्हीजी ग्रुप आयोजीत ‘शोध मराठी मनाचा या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेत आहेत. बीएमसीसीत शिकत असतानाच्या काळाबाबत राज ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले, बीएमसीसीने अनेक बँकेचे प्रशासक निर्माण केले. नीरव मोदीला पैसे देणारे बँकवाले मात्र या महाविद्यालयाचे नव्हते असे ते मिश्कलपणे म्हणाले.
राज ठाकरे : खरं बोलल्याचा कधी त्रास झालाय का?
शरद पवार : खरं बोलण हे चांगल आहे, पण ते अडचणीचं ठरणार असेल, त्यामुळे कुणाचं मनं दुखावणार नसेल तर ते बोलता कामा नये हे शिकलं पाहिजे.
राज ठाकरे : मुल्याधिष्ठीत राजकारण उललेले नाही का?
शरद पवार : यशवंतराव चव्हाणांना एस. एम. जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नाचा किस्सा सांगितला. चौकटीच्या बाहेर कधी जाता कामा नये. आलिकडे व्यक्तिगत हल्ल्यांची आस्था लोकांना वाटत आहे. यावेळी आपण कुठल्या पदावर आहोत याचे भान आपल्याला नसते. टीका करण्याचा अधिकार आहे. जवाहरलाल नेहरुंनी देशासाठी काहीच केलं नाही असं म्हणणं बेजबाबदारपणा आहे. दुसऱ्यांच्या विचारांचा सन्मान कसा करावा याचा आदर्श अटलबिहारी वाजपेयींनी संसदेत घालून दिला. देशाची नवी पिढी देशाला नवी दिशा देईल.
UPDATES :
गांधी कुटुंबावर पंतप्रधानांनी केलेला वैयक्तिक हल्ला चुकीचा – शरद पवार</p>
मोदींनी मला गुरुपणं दिलं त्यात तथ्य नाही – शरद पवार
मराठी नेते मोठे होऊ नयेत म्हणून दिल्लीत लॉबी चालते – शरद पवार
सकारात्मक राजकारणात आता काही उरलं नाही – पवार
फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार तरुणांमध्ये रुजण्याची गरज आहे – पवार
बाळासाहेब ठाकरेंनी जात कधी बघितली नाही नेहमीच कर्तुत्व बघितले – पवार
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण दिले पाहिजे – पवार
पायात पाय घालणे मराठी माणसाने बंद करुन एकमेकांना सहकार्य करायला हवे – पवार
नोटाबंदीने सहकारी बँकांचे कंबरडे मोडले – पवार
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी लोकमत घ्यावे, मात्र ते घेतले जात नाही – पवार
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे मुंबईतील गर्दी वाढेल – पवार
प्रचंड कष्ट घेणे ही मोदींची जमेची बाजू – पवार
राहुल गांधी शिकतायत, समजून घेतायत यामुळं काँग्रेसला अच्छे दिन येतील – पवार
राष्ट्रीय राजकारणात भाजपला केवळ काँग्रेसच पर्याय – पवार
बाळासाहेब ठाकरेंनी देश आणि राज्य प्रथम मानलं – पवार