कलापिनी पुणे कलारसिक मंच औंध-बाणेर, दाबके ट्रस्ट आणि अमृता लायब्ररी यांच्यातर्फे ‘मानवंदना गोनीदांना’ या कार्यक्रमाद्वारे गोनीदांचे साहित्यदर्शन आणि व्यक्तिदर्शन असे दुहेरी स्मरण जागविले गेले.
ज्येष्ठ साहित्यिक गोपाल नीलकंठ दांडेकर यांच्या जन्मशताब्दीवर्षांनिमित्त हा योग जुळवून आणण्यात आला होता. मृण्मयी, गाडगेबाबा, कुण्या एकाची भ्रमणगाथा, पडघवली, दास डोंगरी राहतो या कादंबऱ्यांतील व्यक्तिरेखा सादर झाल्या. कार्यक्रमाची संकल्पना ललिता जोशी आणि विनया केसकर यांची होती. विराज सवाई यांनी दिग्दर्शन केले होते, तर विनायक लिमये यांचे पाश्र्वसंगीत होते. माधुरी ढमाले, कौस्तुभ ओक, शेखर गानू, नागेश गजेंद्रगडकर, अभय लिमये, चेतन पंडित, प्रतीक मेहता, विनायक काळे, अर्चिता लिमये या कलाकारांचा सहभाग होता. डॉ. विजय देव, वृषाली देऊस्कर, मकरंद देऊस्कर, कलापिनीच्या उपाध्यक्षा शर्मिला शहा, शिरीष जोशी, अशोक बकरे या वेळी उपस्थित होते. सृजन नृत्यालय आणि नादबह्म संगीतालयाच्या विद्यार्थिनींनी गोनीदा लिखित गौतम बुद्धाच्या जीवनावरील ‘यशोधरा’ या नृत्यनाटय़ाचा प्रयोग सादर केला. मीनल कुलकर्णी यांचे नृत्यदिग्दर्शन होते.