News Flash

रस्ता रुंदीकरण प्रक्रिया तूर्त ठप्प

शहरात सध्या टाळेबंदी नसली तरी कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत.

पुणे : शहरातील ६ मीटर रुंदीचे रस्ते ९ मीटर रुंदीचे करण्याची प्रक्रिया करोना संकटामुळे तूर्त ठप्प झाली आहे. प्रस्तावित रस्ता रुंदीकरणासंदर्भात आलेल्या हरकती-सूचनांवरील सुनावणी अंतिम टप्प्यात आली असतानाच करोनामुळे ही सुनावणी रखडली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तूर्त थांबली असून शहरातील शेकडो सोसायटय़ांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे.

शहरातील ६ मीटर रुंदीचे रस्ते ९ मीटर रुंद करण्याची प्रक्रिया महापालिके कडून सुरू करण्यात आली आहे. त्याबाबत नागरिकांकडून हरकती-सूचना मागविण्यात आल्या होत्या. या हरकती-सूचनांवर सुनावणी प्रक्रियाही प्रशासनाकडून सुरू करण्यात आली होती. मात्र ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असतानाच करोना संसर्गाचे संकट शहरात सुरू झाले. त्यामुळे सुनावणी घेण्याची प्रक्रियाही लांबणीवर पडली. हरकती-सूचना दिलेल्या नागरिकांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी बोलविण्यात येत होते. मात्र आता करोना संसर्गामुळे ही प्रक्रिया थांबली आहे. दृकश्राव्य पद्धतीने सुनावणी घेण्याबाबत महापालिके चा विचार सुरू आहे. मात्र नागरिकांचा त्याला विरोध होईल, अशी शक्यता अधिकाऱ्यांना वाटत आहे.

शहरात सध्या टाळेबंदी नसली तरी कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. महापालिके नेही सामान्य नागरिकांना महापालिका भवनात येण्यास मनाई के ली आहे. त्यामुळे सध्या सुनावणी घेता येत नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे कडक निर्बंधांमध्ये शिथिलता आणल्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे तूर्तास शेकडो सोसायटय़ांना यामुळे तात्पुरता दिलासा मिळणार आहे.

निवड करण्यात आलेल्या ३३५ रस्त्यांपैकी २३१ रस्त्यांवर एकही हरकत आली  नाही. १०४ रस्त्यांवर तब्बल १ हजार ३४९ हरकती-आक्षेप नोंदविण्यात आले असून सर्वाधिक हरकती, सूचना या डेक्कन जिमखाना, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, कोथरूड, कर्वेनगर आणि एरंडवणा, शिवाजीनगर, औंध या भागातून आल्या आहेत. एकू ण हरकतींपैकी या भागातील हरकती ६५७ एवढय़ा आहेत.

शहरातील रस्ता रुंदीकरणाला गती देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ६ मीटर रुंदीचे ३३५ रस्ते ९ मीटर रुंदीचे करण्याचा निर्णय महापालिके ने घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक सोसायटय़ांचे पार्किं ग हे रस्ता रुंदीकरणात जाणार असून पर्यावरणालाही बाधा पोहोचणार आहे. त्यामुळे महापालिके च्या प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला मोठा विरोध होत आहे. अद्यापही अनेक सोसायटय़ांपर्यंत हा निर्णय पोहोचलेला नाही. नागरिकांच्या वाढत्या विरोधानंतर ज्या ठिकाणी विरोध नसेल त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण के ले जाईल किं वा ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्याच ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे प्रस्ताव तातडीने मान्य के ले जातील, अशी भूमिका सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने घेतली होती. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ता रुंदीकरण आवश्यक आहे. मोकळ्या जागा नसल्यामुळे रस्ता रुंदीकरण करणे अवघड ठरत आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठीची प्रक्रिया महापालिके ने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रस्ता रुंदीकरण होईल आणि इमारतींच्या पुनर्विकासालाही चालना मिळेल, असा दावा सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

२२५ रस्ते जुन्या हद्दीतील

३३५ रस्त्यांपैकी २२५ रस्ते जुन्या शहराच्या हद्दीतील आहेत. उर्वरित ८० रस्ते उपनगरातील आहेत. उपनगरातील रस्ता रुंदीकरणाबाबत अल्प हरकती आल्या आहेत. शहरातील १ हजार ८०० नागरिकांनी हरकती नोंदविल्या असून एकू ण ७०० प्रस्ताव प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. बैठी घरे असलेल्या नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर हरकती नोंदविल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 2:25 am

Web Title: road widening process stalled in pune zws 70
Next Stories
1 आदेशापूर्वीच किराणा दुकाने बंद
2 करोनामुळे ठरलेले मुहूर्त रद्द करून लग्नसोहळे लांबणीवर
3 मार्केट यार्डात गर्दी; पोलीस आयुक्तांकडून नाराजी
Just Now!
X