महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर होण्यास आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मंडळातर्फे शनिवारी निकालाबाबतची घोषणा करण्यात आली. ऑनलाइन निकाल जाहीर केल्यानंतर १५ जूनला विद्यार्थ्यांना गुणपत्रके देण्यात येतील. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी विद्यार्थी २९ जूनपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. या परीक्षेसाठी या वर्षी १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
संकेतस्थळांबरोबरच एसएमएसच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळू शकेल. राज्यातील बीएसएनएल मोबाइलधारकांना ५७७६६ या क्रमांकावर MHSSC < (स्पेस) परीक्षा क्रमांक > असा एसएमएस पाठवून आपला निकाल कळू शकेल. आयडिया, वोडाफोन, एअरसेल, रिलायन्स, युनिनॉर या कंपन्यांच्या मोबाइलवरून MH १० (स्पेस) परीक्षा क्रमांक असा एसएमएस ५८८८८१११ या क्रमांकावर पाठवल्यावर निकाल कळणार आहे. एअरटेल मोबाइलवरून निकाल पाहण्यासाठी MH १० (स्पेस) परीक्षा क्रमांक असा एसएमएस ५२७०११ या क्रमांकावर पाठवायचा आहे.

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे
lwww.mahresult.nic.in
lwww.maharashtraeducation.com
lwww.rediff.com/exams
lwww.knowyourresult.com/MAHSSC