News Flash

शिवराज्याभिषेकावरील स्ट्रिंग चित्राची ‘एशिया बुक’मध्ये दखल

चित्र साकारणारा युवा कलाकार राहुल ठाकरे याचा गौरव झाला आहे.

युवा कलाकार राहुल ठाकरे याचा गौरव

पुणे : तब्बल दहा किलो म्हणजे ४२ हजार ८१० खिळ्यांचा वापर करून पाच महिन्यांत ‘शिवराज्याभिषेक’ या विषयावर साकारलेल्या स्ट्रिंग चित्राची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये दखल घेण्यात आली आहे. चित्रकलेची कोणतीही पाश्र्वभूमी नसताना हे चित्र साकारणारा युवा कलाकार राहुल ठाकरे याचा गौरव झाला आहे.

शिवराज्याभिषेकाची अनेक कलाकारांनी साकारलेली चित्रे अनेकांनी पाहिली असतील. पण, राहुल याने ‘स्ट्रिंग आर्ट’ या माध्यमात हे अनोखे चित्र साकारले आहे. दहा किलो खिळ्यांचा वापर करून राहुलने पाच महिन्यांत ७२० तास काम करून ८ फूट लांबीच्या आणि ४ फूट रूंदीच्या प्लायवूडवर हे चित्र साकारले आहे. या चित्राची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये दखल घेतली गेली आहे. यापूर्वी २८ हजार खिळ्यांचा वापर करून साकारलेल्या चित्राची नोंद होती. त्यामुळे ४२ हजार खिळ्यांचा वापर करून केलेल्या मोठय़ा आकारातील या चित्राची नोंद झाली आहे.

आता लवकरच या चित्राची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राहुल ठाकरे याने सांगितले. मूळचा गोंदिया जिल्ह्य़ातील राहुल पदव्युत्तर शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात आला.

स्ट्रिंग आर्ट प्रकारामध्ये काम करणाऱ्या काकूकडे मी या कलाप्रकारातील चित्र पाहिले. त्याने उत्सुकता वाढली. काकू करीत असलेले काम आणि इंटरनेटच्या मदतीने मी ही कला आत्मसात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 1:50 am

Web Title: string picture of shivaji maharaj coronation enter in asia book zws 70
Next Stories
1 प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
2 जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना २८ कोटी रुपयांची कर्जमाफी
3  पुण्यात शुक्रवारी साहित्य, संगीतमय मैफल
Just Now!
X