News Flash

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू; देहूरोड ते आकुर्डी दरम्यानची घटना

मृताची अद्याप ओळख पटलेली नाही

संग्रहित छायाचित्र

देहूरोड-आकुर्डी रेल्वे मार्गादरम्यान धावत्या रेल्वेमधून पडल्याने एका २५ वर्षीय तरुण मृत्यू झाला आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, देहूरोड ते आकुर्डी या रेल्वे मार्गावर अज्ञात २५ वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वे मधून पडल्याने जागीच मृत्यू झाला. हा अपघात आकुर्डी रेल्वे किलोमीटर ११७/२६ येथे झाला असून लोणावळ्यावरून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वे मार्गावर ही दुर्घटना घडली.

तरुण खाली पडल्यानंतर थेट रेल्वेच्या चाका खाली आला त्यामुळे त्याचे डोके हे धडापासून वेगळे झाले. याची उंची ६ फूट असून त्याने अंगात निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट आणि पूर्ण बाह्यांचा टी शर्ट घातलेला आहे. त्याचा रंग गहूवर्णीय आहे. या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. या घटनेचा पुढील तपास रेल्वे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक करदाळे हे करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 4:36 pm

Web Title: the death of the youth due to falling from a running train
Next Stories
1 आजवर आठ मुख्यमंत्री पाहिले, आत्ताच आरोप कसे?; एकनाथ खडसेंचा सवाल
2 भोसरीत तरूणावर गोळीबार; शहरात २४ तासातील दुसरी घटना
3 खासदार काकडे यांच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
Just Now!
X