News Flash

पिंपरी-चिंचवड: क्रेन अंगावर पडल्याने तीन कामगारांचा मृत्यू

डूडूळगाव येथील राधे रिगल रेसिडेन्सी येथे सहा मजली इमारतीचे काम सुरू होते. सहाव्या मजल्यावर वाळू आणि सिमेंट घेऊन जाणारी क्रेन खाली कोसळली.

नवरात्रीनिमित्त कालिका देवीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या सात लहान मुलांना एका अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच म़त्यू झाला तर उर्वरित मुले जखमी आहेत.

पिंपरी-चिंचवड हद्दीतील डूडूळगाव येथे इमारतीचे काम करणाऱ्या तीन कामगारांचा मालवाहू क्रेन अंगावर पडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली आहे. पांडुरंग बसप्पा चव्हाण (वय ३५), भगवान गायकवाड (वय २९) ,अमर राठोड (वय २८) अशी अपघातातील मृत कामगारांची नावे आहेत. दिघी पोलिसांत याप्रकरणाची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (गुरुवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास डूडूळगाव येथील राधे रिगल रेसिडेन्सी येथे सहा मजली इमारतीचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक सहाव्या मजल्यावर वाळू आणि सिमेंट घेऊन जाणारी क्रेन खाली कोसळली. यात तीन कामगार गंभीर जखमी झाले. घटनेत दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 5:32 pm

Web Title: three helper dead due to crane collapse in pimpri chinchwad
Next Stories
1 दुधीचा रस पिऊन पुण्यात ४१ वर्षीय महिलेचा मृत्यू
2 डीएसके गैरव्यवहार प्रकरण: महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठे ससूनमध्ये दाखल
3 VIDEO: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोला भीषण आग
Just Now!
X