News Flash

धक्कादायक! पिंपरीत सख्ख्या बहिणींवर अल्पवयीन मुलांनी केला लैंगिक अत्याचार

पिंपरी- चिंचवडमध्ये राहणाऱ्या सहा वर्षांच्या मुलीला काही दिवसांपूर्वी शाळेत 'गुड टच आणि बॅड टच' या संदर्भातील माहिती दिली जात होती. यादरम्यान हा प्रकार उघड झाला.

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरी- चिंचवडमधील दोन सख्ख्या लहान बहिणींवर दोन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्याचार करणारी दोन्ही नराधम मुलंही अल्पवयीन असून अद्याप नराधमांना अटक करण्यात आलेली नाही.

पिंपरी- चिंचवडमध्ये राहणाऱ्या सहा वर्षांच्या मुलीला काही दिवसांपूर्वी शाळेत ‘गुड टच आणि बॅड टच’ या संदर्भातील माहिती दिली जात होती. यादरम्यान पीडित मुलीने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती शिक्षिकेला दिली. शिक्षिकेने हा प्रकार पीडित मुलीच्या आईला सांगितला. मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे विचारणा करा, असे पीडित मुलींच्या आईला सांगण्यात आले होते. यानुसार आईने दोन्ही मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली. यादरम्यान त्यांनी परिसरात राहणारी १४ आणि १६ वर्षांची दोन मुलं अत्याचार करत असल्याचे सांगितले.

पीडित मुलींचे वडील हे बिगारी काम करतात. तर त्यांची आई धुणीभांडीची काम करते. या मुली दररोज घरासमोरील मोकळ्या जागेत खेळायच्या. त्याच्या चाळीपासून काही अंतरावर बांधकाम सुरु असून तिथे हे नराधम नियमित यायचे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी बांधकाम साईटवरील कार्यालयात त्या मुलींवर अत्याचार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बांधकाम साईटच्या कार्यालयात कोणीही नसताना ते मुलींना खेळण्याच्या बहाण्याने तिथे घेऊन जायचे आणि त्यांच्यावर अत्याचार करायचे. पोलिसांनी नराधम मुलांविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 12:25 pm

Web Title: two booked for raping minor sister in pimpri accused absconding
Next Stories
1 रिपब्लिकन ऐक्याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारावे- आठवले
2 लोकशाही रुजविण्यासाठी व्यवस्थेचे सक्षमीकरण महत्त्वाचे
3 बीआरटी पुनर्रचनेचा ७५ कोटींचा खर्च वाया
Just Now!
X