खरे नक्षलवादी आहेत, त्यांना पकडलंच पाहिजे. सध्याचे राज्यकर्ते आणि त्यावेळचे विरोधक संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करीत होते. आता सरकार येऊन वर्ष झालं. हे सरकार मूग गिळून गप्प का आहे? त्यांनी कारवाई करायला पाहिजे. आता त्यांनी अटक करावी असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

करोनामुळे यंदा भीमा-कोरेगावला येऊ नका. घरातच प्रार्थना करावी असे त्यांनी आवाहन केले. मी एक जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तिथे जाऊन अभिवादन करणार आहे असे रामदास आठवले यांनी सांगितले.

“शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे. सरकारने आडमुठे धोरण स्वीकारलेले नाही, चर्चेचे दरवाजे खुले आहेत. मात्र कायदे रद्द होणार नाहीत. त्यासाठी शेतकऱ्यांनी अट्टाहास करू नये. अन्यथा कायदे रद्द करण्याची सुरुवात होईल. तसेच काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात हा कायदा करण्याचा मुद्दा होता. आता ते विरोध करत आहेत. आंदोलन राजकीय सुरू झाले आहे. आता ते शेतकर्‍यांच आंदोलन राहिले नाही. त्यात फक्त पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी आहेत” असे रामदास आठवले म्हणाले.

मराठा आरक्षण बाबत राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात बाजू मांडता आली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाव ही आमची सुरुवाती पासून मागणी राहिली असून ते मिळाले पाहिजे असे रामदास आठवले म्हणाले.