नारायणगाव : जुन्नर येथील श्री विघ्नहर साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच उसाची रक्कम अदा करण्यात येणार असून, कामगारांना १२ टक्के बोनस जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आणि कामगारांची दिवाळी गोड होणार आहे.श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा ३७ व्या गळीत हंगामाची सुरुवात नुकतीच करण्यात आली. त्यावेळी याबाबतची माहिती देण्यात आली. माजी आमदार दिलीप ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, सभापती संजय काळे, जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके, कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आदींच्या हस्ते पूजन करू गव्हाणीत मोळी टाकण्यात आली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>‘पीएमआरडीए’च्या घरकुल योजनेसाठी अर्जाची मुदत वाढवली ; १८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची संधी

साखर निर्यातीच्या धोरणाबाबत सत्यशील शेरकर म्हणाले, की केंद्र सरकाने जून २०२२ पासून साखरेच्या निर्यातीवर निर्बंध आणले असल्याने भारतातून निर्यात होणारी साखर पूर्णपणे थांबली. परिणामी देशांर्तगत साखरेचे भाव स्थिर राहिले. केंद्र सरकारने निर्यातीवरील बंदी तत्काळ उठवून साखर निर्यातीचा मार्ग मोकळा करावा. सुमित्रा शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप आदींसह सर्व आजी माजी संचालक त्या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे : ‘एएफएमसी’च्या संचालकपदी आरती सरीन

इथेनॉलच साखर कारखान्यांना वाचविणार
साखरेपासून कारखान्यांचा उत्पादन खर्च निघणे मुश्कील आहे. इथेनॉल प्रकल्पच भविष्यकाळामध्ये साखर कारखानदारीला वाचविणार असून, केंद्र सरकारचे धोरण इथेनॉलसाठी पूरक आहे. विघ्नहरच्या विस्तारीत इथेनॉल प्रकल्पाची किंमत सुमारे १११ कोटी आहे. बँकेकडून ९३ कोटी इतके कर्ज मंजूर झाले आहे . त्यामध्ये स्वनिधी म्हणून जवळपास १९ कोटी टाकावे लागणार असून लवकरच हा प्रकल्प सुरू होणार असल्याचे सत्यशील शेरकर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 percent bonus to sugarcane workers before diwali from shree vighnahar sugar factory amy
First published on: 07-10-2022 at 19:08 IST