पुणे : आर्थिक वादातून उरुळी कांचन परिसरात गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या उद्योजकाकडून एक बंदुक, बंदुकीची १७५ काडतुसे, तसेच पिस्तुलाची ४० काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. उद्योजकाला मदत करणाऱ्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

बापु उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे (वय ४६) निलीमा बापु उर्फ दशरथ शितोळे (वय ४२), जिग्नेश दशरथ शितोळे (वय १९) आशा सुरेश भोसले (वय ५२), निखील अशोक भोसले (वय २५ सर्व रा. इनामदारवस्ती कोरेगाव मूळ, उरुळी कांचन, ता. हवेली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना १८ सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा…पुणे : सायबर चोरट्यांकडून तिघांची ६८ लाखांची फसवणूक

उरुळी कांचन परिसरातील शेतकरी काळुराम महादेव गोते आणि शरद कैलास गोते (दोघे रा. भिवरी ता.हवेली) यांनी दीड वर्षांपूर्वी आरोपी बापू उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे याला शितोळेला ४० लाख रूपये दिले होते. त्यानंतर आरोपीने पैसे देण्यासाठी दोघांना घरी बोलावले होते. पैसे मागितल्याच्या रागातून आरोपीने काळुराम आणि शरद यांच्यावर पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या. काळुराम गोते यांचा हात आणि पायाला गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या.

हे ही वाचा…अमेरिकेतील शिवशार्दूल पर्कशन्सच्या ढोल-ताशा गर्जनेची दशकपूर्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोळीबारातील मुख्य आरोपी बापू शितोळे शेतात लपल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने शितोळे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली. कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक शंकर पाटील, सहायक निरीक्षक राहूल गावडे, ज्ञानेश्वर बाजीगिरे, सपांगे, उपनिरीक्षक अमित सिद-पाटील, काशीनाथ राजापुरे, बाळासाहेब कांरडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख यांनी ही कारवाई केली.