scorecardresearch

पुण्यात करोनाचे २७६ नवे रुग्ण तर पिंपरीत ९८ नवे रुग्ण

पुण्यात पाच जणांचा मृत्यू तर पिंपरीत तिघांचा करोनामुळे मृत्यू

पुण्यात करोनाचे २७६ नवे रुग्ण तर पिंपरीत ९८ नवे रुग्ण
(संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने २७६ रुग्ण आढळल्याने १ लाख ६४ हजार ३४१ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ४ हजार ३७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ३६७ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ५५ हजार ५९२ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९८ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७२ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८९ हजार ३८१ वर पोहचली असून पैकी, ८६ हजार ३४७ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६४३ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या