मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यातील ९३ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>पुणे : २०१४ नंतर ‘आयुष’ जगभरात ; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगळवारी दिवसभरात आढळलेल्या ९३ नवीन रुग्णांपैकी ४० रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. ३९ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात, तर १४ रुग्ण जिल्ह्याच्या उर्वरित भागात आढळले आहेत. पुणे शहरातील एका रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला आहे. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी विशेषत: जोखीम गटातील रुग्ण, सहव्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लसीकरण न झालेल्या नागरिकांनी मुखपट्टी वापरासह सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मंगळवारी आढळलेल्या ९३ नव्या रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णसंख्या १५ लाख दोन हजार ७२१ एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील ५१८ रुग्णांवर करोनाचे उपचार सुरू आहेत.