पुणे : सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे परिसरात सदनिकेत वडील आणि मुलगा मृतावस्थेत सापडल्याची घटना उघडकीस आली. मृत्यूमागचे कारण समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागचे कारण समजू शकेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अरुण पायगुडे (वय ६४) आणि ओंकार पायगुडे (वय ३२) अशी मृतावस्थेत सापडलेल्यांची नावे आहेत. नऱ्हे परिसरात व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलजवळ एका सोसायटीत वडील आणि मुलगा मृतावस्थेत पडल्याची माहिती सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अरुण पायगुडे रेल्वेतून निवृत्त झाले होते. त्यांच्या एका मुलीचा विवाह झाला आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. दोन वर्षांपूर्वी ओंकारचा अपघात झाला होता. तेव्हापासून त्याची मानसिक स्थिती बिघडली होती. तो घराबाहेर देखील फारसा पडायचा नाही. अरुण आणि त्यांचा मुलगा ओंकार यांना दारु पिण्याचे व्यसन होते, अशी माहिती सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली.

हेही वाचा – पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा

हेही वाचा – मराठा सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही; मागासवर्ग आयोगाची स्पष्टोक्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पायगुडे यांच्या घरातील कचरा घेण्यासाठी सफाई कामगार गेला. तेव्हा दोघेजण बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्याने पाहिले. शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह गुरुवारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूमागचे निश्चित कारण समजू शकेल, असे पाेलिसांनी सांगितले.