पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजीनगर बसस्थानकाच्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

एसटी महामंडळाच्या शिवाजीनगर येथील बसस्थानकाच्या जागेवर महामेट्रोचे स्थानक उभारण्याचे काम सुरू असून, संबंधित स्थानक वाकडेवाडी येथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले. जागेच्या मोबदल्यात महामेट्रो आणि एसटी महामंडळ यांच्यात करार झाला असून, मूळ स्थानकाचे बांधकाम महामेट्रोकडून करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप किर्दत यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर बसस्थानकाचा आराखडा तयार करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, याबाबत कार्यवाही झालेली नाही, असेही किर्दक म्हणाले. ‘महामेट्रो आणि एसटी महामंडळाकडून समन्वयाने नकाशा तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच याबाबत कार्यवाही करण्यात येईल. प्रवाशांच्या दृष्टीने शिवाजीनगर येथील पूर्वीच्या जागेवरच स्थानक होईल,’ असे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी स्पष्ट केले.