पुणे: एकतर्फी प्रेमातून सदाशिव पेठेत तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार करणाऱ्या हल्लेखोर तरुणाची रवानगी न्यायालयाने येरवडा कारागृहात केली आहे.

शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून आरोपी शंतनूने तरुणीवर पेरूगेट चौकीपासून काही अंतरावर २७ जून रोजी कोयत्याने हल्ला केला होता. या घटनेत तरुणी जखमी झाली होती. त्या वेळी तीन महाविद्यालयीन तरुणांनी आरोपी शंतनूला रोखल्याने तरुणी बचावली होती. नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तरुणीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा… “दोन दिवसांपूर्वीच त्याने दर्शना पवारच्या हत्येविषयी…”, तरुणीला कोयता हल्ल्यातून वाचवलेल्या लेशपालच्या आईची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी (१ जुलै) संपली. त्यानंतर त्याला विश्रामबाग पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालायात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.