पुणे जिल्ह्यामधील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमध्ये भरदिवसा पाच जणांनी दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना आज (गुरूवार) घडली. दरोडेखोरानी सोने आणि रोख रक्कम अशी मिळून १ कोटीहून अधिकची लूट केली.

पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमध्ये दुपारी दीड वाजेच्या सुमारास १० ते १५ ग्राहक बँकेत होते. त्यावेळी चारचाकी वाहनातून पाच जण बँकेत आले. त्यातील एक जण बँकेच्या दारात थांबला, इतर चौघांनी मॅनेजर आणि कॅशियरला बंदुकीचा धाक दाखवून, त्यांच्याकडून लॉकरच्या चाव्या घेतल्या. त्यानंतर त्यांनी रोख रक्कम आणि सोने बॅगेत भरले आणि काही मिनिटात ते सर्वजण चारचाकी वाहनातून पसार झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच काही मिनिटात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ज्या वाहनामधून दरोडाखोर बँकेत आले होते, त्यावर प्रेस असे लिहिले होते. अशी माहिती प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आली आहे. तसेच आता बँक अधिकारी आणि कर्मचार्‍याकडून माहिती घेतली जात आहे. बँकेतील सोने आणि रोख रक्कम मिळून जवळपास १ कोटीहून अधिकची लूट झाल्याची सध्या तरी माहिती मिळत आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. अशी देखील माहिती देण्यात आली आहे.