भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार अप्पा गोगटे (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने रविवारी रात्री सव्वानऊ वाजता पुण्यात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. देवगड (जि. सिंधूदुर्ग) येथील जामसंडे या मूळ गावी अप्पा गोगटे यांच्या पार्थिवावर सोमवारी (१७ जून) अंत्यसंस्कार होणार आहेत.
संयुक्त रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले अप्पा गोगटे देवगड मतदारसंघातून १९८५ मध्ये विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. २००० पर्यंत सलग चार वेळा त्यांनी देवगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. तीन-चार दिवसांपूर्वी अप्पा घरात पाय घसरुन पडले. शस्त्रक्रियेसाठी त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jun 2013 रोजी प्रकाशित
भाजपचे माजी आमदार अप्पा गोगटे यांचे निधन
भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार अप्पा गोगटे (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने रविवारी रात्री सव्वानऊ वाजता पुण्यात निधन झाले.

First published on: 17-06-2013 at 02:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp former mla appasaheb gogate passed away