पुणे : सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने कॅनॉल रस्त्याचा वापर वाढला आहे. कॅनॉल रस्त्यावर रहदारी वाढल्याने कॅनॉल रस्ता प्रायोगिक तत्त्वावर एकेरी करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. कॅनॉलच्या पलीकडून जाणारा जुना रस्ता, तसेच नवीन कॅनॉल रस्ता एकेरी करण्यात येणार आहे.

स्वारगेटकडून वडगाव आणि धायरीकडे जाणारी वाहने सिंहगड रस्त्यावरील गणेशमळा येथील सिग्नलपासून डावीकडे वळून जनता वसाहत कॅनॉल रस्त्याने हिंगणे परिसरातील एचडीएफसी बँकेच्या पुढील चौकात जातील. तेथून डावीकडे वळून आनंदविहार कॉलनीजवळून जाधव चौकापर्यंत एकेरी मार्गाने जाता येईल.

हेही वाचा – पिंपरी चिंचवड : अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे विरोधी पक्षाचे नेते नजरकैदेत

हेही वाचा – बाळासोबत मातेसाठीही स्तनपान फायद्याचे! जाणून घ्या कारणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वारगेटकडे जाण्यासाठी सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयापासूनचा नवीन कॅनॉल रस्ता एकेरी करण्यात येणार आहे. या रस्त्याने विश्रांतीनगरपर्यंत जाता येईल. या दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या लंडन पुलावर चारचाकी वाहनांना तसेच दोन्ही कॅनॉल रस्त्यावर जड वाहतुकीस बंदी करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांच्या काही सूचना किंवा हरकती असल्यास २० ऑगस्टपर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.