घराच्या ‘रेकी’च्या विधानावरून नवाब मलिकांना चंद्रकांत पाटलांनी लगावला टोला, म्हणाले…

मागील काही दिवसांपासून माझं घर आणि शाळेची ‘रेकी’ केली जात आहे, असं नवाब मलिक म्हणालेले आहेत.

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी ट्वीट करत खळबळजनक विधान केलं होतं की, मागील काही दिवसांपासून काही लोक गाडीत बसून माझे घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत. तसेच या संशयितांचे फोटोही त्यांनी ट्विट केले होते. यावेळी नवाब मलिकांनी या फोटोतील लोकांना कुणी ओळखत असेल तर माहिती देण्याचंही आवाहन केलं होतं. यावर आज पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी प्रतिक्रिया दिली.

नवाब मलिक यांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करून म्हणाले…!

माध्यम प्रतिनिधींनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “अरे राज्यात सरकार आहे त्यांचं. जरी एक गृहमंत्री तुरूंगात असले, दुसरे गृहमंत्री हे मनाविरुद्ध गृहमंत्री झालेले असले, सारखे आजारी पडत असले या सगळ्या ताणतणावामुळे. तरी, गृहमंत्री त्यांचं असणारं सरकार आहे. काय हास्यास्पद वाक्य आहे की पाळत ठेवतात. तुमचं पोलीस डिपार्टमेंट काय करतयं?”

केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याच्या चर्चांवर चंद्रकांत पाटलांनी सोडलं मौन; म्हणाले “पाटील काय चीज आहे…”

नवाब मलिक यांनी गाडीत बसलेल्या लोकांचे फोटो ट्विट करत, “या गाडीत बसलेले हे लोक मागील काही दिवसांपासून माझं घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत. जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्या. या फोटोत असलेल्या लोकांनी मला येऊन भेटावं, मी सर्व माहिती देतो असंच माझं त्यांना सांगणं आहे.” असं म्हटलं होतं.

महाविकासआघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण ; चंद्रकांत पाटील यांनी साधला निशाणा, म्हणाले…

राज्यातील महाविकासआघाडी सरकार आज आपल्या कार्यकाळाची दोन वर्षे पूर्ण करत आहे. या पार्श्वभूमीवर आज(रविवार) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारपरिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chandrakant patal aimed at nawab malik on the reiki statement of the house msr

Next Story
महाविकासआघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण ; चंद्रकांत पाटील यांनी साधला निशाणा, म्हणाले…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी