scorecardresearch

मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक ; दुचाकीवरील महिलेसह तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू

पुष्पा पवन शर्मा आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा युवराज अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

accident on mumbai pune expressway
प्रतिनिधिक छायाचित्र

लोणावळा : मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सहप्रवासी महिला आणि तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुष्पा पवन शर्मा आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा युवराज अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात दुचाकीस्वार पवन गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिलाटणे फाटा परिसरातून दुचाकीस्वार पवन, त्यांची पत्नी पुष्पा आणि मुलगा युवराज जात होते. त्या वेळी अवजड ट्रकने (ट्रेलर) दुचाकीला धडक दिली. अपघातात पुष्पा आणि त्यांचा मुलगा युवराज यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार पवन यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले.

या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कर्मचारी शरद जाधवर तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Child along with woman on two wheeler killed in road accident on mumbai pune highway zws