scorecardresearch

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी ३० दिवसांत १०० खांबांची उभारणी

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी गणेशखिंड रस्त्यावर मोदीबागेसमोर नियोजित स्थानक क्रमांक २१ येथे या मेट्रोचा चारशेवा खांब गुरुवारी उभा करण्यात आला.

Hinjewadi Shivajinagar metro project
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी ३० दिवसांत १०० खांबांची उभारणी (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) प्रस्तावित करण्यात आलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी गणेशखिंड रस्त्यावर मोदीबागेसमोर नियोजित स्थानक क्रमांक २१ येथे या मेट्रोचा चारशेवा खांब गुरुवारी उभा करण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात बालेवाडी येथे तिनशेवा खांब उभारण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या महिनाभरात १०० खांब उभारण्यात आले आहेत.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड : आईने चापट मारली म्हणून १४ वर्षीय मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

हेही वाचा – पुणे : बँकेत पैसे घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराला अडवून ४७ लाखांची रोकड लंपास

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोचे काम सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समुहाने हाती घेतले असून, त्याच्या कार्यान्वयनासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष वहन कंपनीची (स्पेशल पर्पज व्हेईकल – एसपीव्ही) स्थापना करण्यात आलेली आहे. आगामी काळात प्रकल्पाच्या कामाला आणखी वेग देऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न असल्याचे प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 22:37 IST

संबंधित बातम्या