पुणे : धावत्या रेल्वेत तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मावस भावाला सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

आरोपी मर्चंट नेव्हीमध्ये अभियंता असून त्याला बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविले. याबाबत पीडित तरुणीने भोसरी एमआयडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार १४ जुलै २०१५ रोजी संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये आणि दुसऱ्या दिवशी पुण्यात पीडित तरुणीच्या मावशीच्या घरी घडला होता. पीडित मुलगी, तिची मावशी आणि आरोपी मावस भाऊ रेल्वेने पुण्याकडे येत होते. भोपाळ रेल्वे स्थानक येण्यापूर्वी पीडित तरुणी रेल्वेतील प्रसाधनगृहात गेली. आरोपीने धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. घाबरलेल्या तरुणीने पुण्यात आल्यानंतर या प्रकाराची माहिती मावशी आणि मैत्रिणीला दिली. दुसऱ्या दिवशी तरुणीच्या मैत्रिणी तिच्या मावशीच्या घरी आल्या. त्यावेळी तिने रेल्वेत घडलेला प्रसंग मैत्रिणींना सांगितला. त्या वेळी मावस भाऊ तिथे आला. त्याने तिला जमिनीवर ढकलून तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. मावशी आणि मैत्रिणीने तिला सोडविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी आरोपीने त्यांना मारहाण केली आणि तो घरातून पसार झाला.

हेही वाचा… शाळकरी मुलीचा गावठी दारू विकतानाचा व्हिडिओ व्हायरल ; पोलीस उपायुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

या प्रकरणात आरोपीवर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे आणि भोपाळ रेल्वे पोलिस ठाण्यात बलात्कार, खुनाचा प्रयत्न, धमकावणे यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील, सहायक पोलिस फौजदार नारायण पवार यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.

हेही वाचा… बाजारात उत्सवऊर्जा ; करोनानंतरच्या भीतीमुक्त वातावरणात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी झुंबड

मावशी आणि मैत्रिणीची साक्ष महत्त्वाची

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील ॲड. पुष्कर सप्रे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून अकरा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पीडितेची मावशी आणि मैत्रिणीची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने मावस बहिणीवर बलात्कार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून, त्याला अधिकाधिक कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील सप्रे यांनी केला. न्यायालयाने आरोपीला बलात्कार प्रकरणात दहा वर्षे आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत