दहा ते पंधरा टक्क्यांचा परताव्याच्या आमिषाने कोट्यावधी रुपये..

पिंपरी- चिंचवड: १ करोड ११ लाखांची फसवणूक करणाऱ्या  टोळीला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. १० ते १५ टक्क्यांचा परतावा मिळवून देण्याचा बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली. शरद दिलीप सराफ, सूरज तात्याराम सायकर, संकेत संदीप व्हावले, नागेश नरसिंगराव गंगे आणि योगीराज किसन जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एक्सप्रेस प्लॅटफॉर्म कंपनीच्या व्हाट्स नंबर वरून फिर्यादी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. गुंतवणूक केल्यास १० ते १५ टक्के परतवा मिळेल अस अमिश दाखवण्यात आले. फिर्यादी यांनी विश्वास ठेवून आधी काही पैसे गुंतवले, त्यात त्यांना चांगला परतवा मिळाला. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीने पैशांच्या अमिषापोटी आरोपींच्या वेगवेगळ्या बँक खात्यात तब्बल १ करोड ११ लाख रुपये गुंतवले. त्यानंतर मात्र परताव्याची रक्कम बँक खात्यात जमा होत नसल्याच निदर्शनास आले.

फिर्यादीने आरोपीला फोनद्वारे माहिती दिली. यावर रक्कम काढायची असल्यास तुम्हाला शासनाचा टॅक्स भरावा लागेल. तुम्हाला रक्कम काढता येणार नाही. असं सांगण्यात आलं. फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचं समजलं. या प्रकरणी अखेर पिंपरी-चिंचवड च्या सायबर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. रक्कम मोठी असल्याने सायबर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिकदृष्ट्या तपास केला. सायबर पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या टीम ला तपास करण्यास आदेश दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तपासादरम्यान २ लाख रुपये ज्या फायनान्स बँकमधून काढण्यात आले त्या आरोपीला पोलिसांनी नागपूरमधून बेड्या ठोकल्या. शरद दिलीप सराफ याने गुन्हा केल्याचं उघड झाल. सुरज सायकर, संकेत न्हावले यांचा देखील सहभाग असल्याचं उघड झाल. योगीराज किसन जाधव याच्याकडून वेगवेगळे बँकेचे अकाऊंट त्यावर कोट्यवधी रुपये घेऊन ते घेतल्याचं निष्पन्न झाल. हे पैसे नागेश गंगे च्या साथीने क्रिप्टो करन्सीमध्ये घेत असल्याचे तपासात समोर आलं. अखेर त्यांना सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, प्रवीण स्वामी यांच्या टीमने केली आहे.