Dagdusheth Ganpati Visarjan: गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्ट मार्फत विसर्जन मिरवणुकीत दुपारी चार वाजता सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता.ठरलेल्या नियोजित वेळेनुसार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुख्य मंडपामधून मिरवणुकीला सुरुवात झाली.त्याच दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. तरीदेखील त्याच उत्साहात विसर्जन मिरवणूक बेलबाग चौकामार्गे लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली. ८ वाजून ५० मिनिटांनी गणपतीचे पांचाळेश्वर मंदिर घाटावर विसर्जन करण्यात आले.

पाहा VIDEO

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या…