वस्तू तयार करणाऱ्या कारखान्यांवरही परिणाम

प्रकाश खाडे
जेजुरी : करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील तीर्थक्षेत्रे गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत. धार्मिक कार्यासाठी लागणाऱ्या पितळ, तांबे धातूच्या देवतांच्या मूर्ती, खंडोबाची दिवटी-बुधली आणि इतर वस्तूंची मागणी घटल्याने या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे जाणवत आहे. या वस्तू तयार करणाऱ्या कारखान्यांतील उत्पादनावरही परिणाम दिसून येत आहे.

जेजुरी, पंढरपूर ,तुळजापूर ,आळंदी, शिर्डी ,नाशिक, वणी आदी तीर्थक्षेत्रांमध्ये लाखो भाविकांची कायम गर्दी असते .त्यांचेकडून तांबा- पितळेच्या विविध देवतांच्या मूर्ती, धार्मिक कार्यासाठी लागणारे तांब्याचे ताम्हण, पळी, भांडे कलश, विविध प्रकारचे पितळी दिवे, घंटा, टाळ आदी वस्तू मोठय़ा प्रमाणात खरेदी केल्या जातात. त्यामुळे हा व्यवसाय करणारी शेकडो दुकाने तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी आहेत. या व्यवसायातून कोटय़ावधीची उलाढाल होते. राज्यातल्या विविध ठिकाणी धार्मिक कार्याला लागणाऱ्या या धातूच्या वस्तू बनवण्याचे लहान-मोठे कारखाने आहेत, तर चांगली बाजारपेठ उपलब्ध असल्याने मुरादाबाद (उत्तर प्रदेश) येथूनही मोठय़ा प्रमाणात या वस्तू आपल्याकडे विक्रीसाठी येतात. सध्या या वस्तूंची विक्री करणारे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत .

mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण
chipko movement, chipko movement lokrang article
चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…

टाळेबंदी झाल्यानंतर राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भरणाऱ्या यात्रांवर बंदी आली, मंदिरे बंद झाल्याने येणारे भाविक बंद झाले. त्यातून धातूंच्या उत्पादनाची विक्री थांबली. पंढरपूरला लहान-मोठय़ा प्रकारच्या टाळांची, तर जेजुरीत खंडोबाला लागणाऱ्या  दिवटी-बुधलीची  विक्री मोठय़ा प्रमाणात होते. मात्र, सध्या हे सर्व चक्र थांबले आहे. मागणीत मोठी घट झाल्याने कारखान्यातील उत्पादनावरही परिणाम जाणवत आहे.

खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये तांब्या-पितळेच्या मूर्ती व वस्तू विकणारी अनेक दुकाने आहेत. रात्रीच्या वेळी झगमगणाऱ्या विद्युत दिव्यांच्या उजेडात पिवळीधमक चमकणारी ही दुकाने सध्या गर्दीविना शांत आहेत. जेजुरीत येणारे भाविक नव्या दिवटी-बुधलीची मोठय़ा प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे आमचा प्रपंचाचा गाडा चालतो. सध्या मंदिर बंद असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.

– आनंद गोलांडे, व्यावसायिक, जेजुरी