पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे ऑनलाइन जुगाराच्या माध्यमातून करोडपती झाले असले तरी त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजपाचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र व्यवहार केला. त्यानंतर काही तासातच पिंपरी- चिंचवड पोलिसांनी देखील कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी तपासून पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.चौकशीनंतर त्यांच्यावर कारवाईबाबत निर्णय घेण्यात येईल  या प्रकरणाची चौकशी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे या करत आहेत

हेही वाचा >>> पिंपरीतील फौजदार ऑनलाइन जुगारातून झाला कोट्यधीश; पण जुगार खेळणे येणार अंगलट

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मुख्यालय या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना ड्रीम इलेव्हन च्या ऑनलाईन जुगारामध्ये अव्वल क्रमांक आल्याने तब्बल दीड कोटींची बक्षीस मिळाले आहे. यामुळे  झेंडे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. हा आनंद फार काळ काही टिकला नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या संदर्भात भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. अवघ्या काही तासांमध्येच पिंपरी- चिंचवड पोलिसांकडून त्यांची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासून पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिली आहे. तपासांती त्यांच्यावर कारवाई करायची का नाही ते ठरवलं जाईल असे देखील त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा >>> “ललित पाटील तुमच्या ताब्यात होता, त्याला नीट सांभाळता आलं नाही”, न्यायालयाने पुणे पोलिसांना सुनावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाइन जुगारापासून तरुण पिढीला वाचविण्यासाठी शासनाकडून उपक्रम राबविले जात असताना फौजदार सोमनाथ झेंडे सरकारी नोकरीत असूनही जुगार खेळले. त्यातून त्यांना काही रक्कम मिळाली. त्याचा गाजावाजा करून त्यांनी ऑनलाइन जुगाराला चालना देण्याचे काम केले आहे. यातून लहान मुलांना ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे.- अमोल थोरात माजी सरचिटणीस भाजप