पुणे : महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर शेलक्या शब्दात अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे. समोर सक्षम उमेदवार असता तर बोलायला मजा आली असती. मात्र, अनेक पक्षातून बेडूक उड्या घेऊन आलेल्या उमेदवारावर बोलणे योग्य नाही. विरोधकांची केवलवाणी परिस्थिती झाली असल्याचा निशाणा त्यांनी साधला आहे. शिरूर लोकसभेची उमेदवारी ही छगन भुजबळ यांना देण्याचा प्लॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला आहे. अमोल कोल्हे हे महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते.

यावेळी महाविकास आघाडीच्या सभेला जयंत पाटील, सचिन अहिर, अमोल कोल्हे,शहराध्यक्ष तुषार कामठे आदी उपस्थित होते. कोल्हे म्हणाले, समोर सक्षम उमेदवार असता तर बोलायला मजा आली असती. महायुतीचे उमेदवार चार पक्षातून बेडूक उड्या घेऊन गेले असले तरी त्यांना पहिली पसंती नव्हती.

हेही वाचा…मावळ : ‘वंचित’च्या उमेदवार माधवी जोशी गुपचूप आल्या आणि अर्ज भरून निघून गेल्या!

उमेदवारी वेगळ्या ठिकाणी देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा होती. पुढे ते म्हणाले, छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या डोक्यात होत. छगन भुजबळ यांनी नकार दिल्यामुळे बेडूक उड्या घेऊन राष्ट्रवादी असलेल्या शिवाजी आढळराव पाटील यांना देण्यात आली. त्यांचो केविलवानी परिस्थिती झाल्याने त्यांच्यावर बोलणं उचित नाही. अस म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.