पुणे : नगर रस्ता परिसरातील वीज ग्राहकांसाठी शनिवारी (२३ डिसेंबर) सकाळी दहा ते दुपारी तीन ही वेळ महत्त्वाची ठरणार आहे. कदाचित वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. महावितरण आणि महापारेषण यांनी दक्षता घेतली असली तरी तरी तांत्रिक बिघाड झाला तर पर्यायी सोय उपलब्ध होऊ शकणार नसल्याने वीजपुरवठा खंडित होऊ शकतो.

महापारेषण कंपनीचे खराडी येथील १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र अत्यावश्यक पूर्वनियोजित देखभाल आणि दुरुस्तीसाठी शनिवारी (२३ डिसेंबर) सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत बंद राहणार आहे. मात्र, या कालावधीत पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याने नगर रस्ता परिसरातील वीजपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

water supply, Kandivali,
कांदिवली बोरिवलीमध्ये गुरुवारपासून २४ तास पाणीपुरवठा बंद
Water scarcity, Badlapur, Ambernath,
बदलापूर, अंबरनाथमध्ये शुक्रवार, शनिवारी पाणीबाणी; तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद
water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ
Why three new swimming pools will start in Mumbai How to plan the municipal corporation
पाण्याचा तुटवडा, तरीही मुंबईत तीन नवे जलतरण तलाव का सुरू होणार? महापालिकेचे नियोजन कसे?

हेही वाचा >>>मक्याचे कणीस सोलण्यासाठीच्या यंत्रावर पेटंटची मोहोर

महापारेषणच्या खराडी १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून महावितरणच्या २२ केव्हीच्या पाच वीजवाहिन्यांद्वारे खुळेवाडी, विमाननगर परिसर, सोपाननगर, कोलते पाटील फेज १ ते ४, येरवडा, शास्त्रीनगर, लक्ष्मीनगर, संजय पार्क, आळंदी रस्ता, संभाजीनगर, न्याती, लोहगाव, वडगाव शिंदे, वडगाव गावठाण, पाटीलमळा, खांदवेनगर, खराडी बायपास, वडगाव शेरी परिसर, धानोरी परिसर, श्री पार्क सोसायटी, श्रीराम सोसायटी, खुळेवाडी गाव, गिगा स्पेस बिल्डिंग आदी परिसराला वीजपुरवठा केला जातो. मात्र, महापारेषणच्या उपकेंद्रातील काही यंत्रणेची दुरुस्ती सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अतिशय आवश्यक झाली आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम होणार आहे. या कालावधीत महावितरण आणि महापारेषणकडून ३४ मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन करून पर्यायी स्वरुपात सर्व पाचही वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

महावितरणकडून पर्यायी वीजपुरवठ्यासाठी तांत्रिक नियोजन पूर्ण झाले आहे. मात्र ऐनवेळी पाचपैकी एखाद्या वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी सोय उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे संबंधित वाहिनीवरील भागात वीज खंडित होऊ शकते. त्यासंबंधीची माहिती संबंधित वीजग्राहकांना एसएमएसद्वारे ताबडतोब दिली जाणार आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण आणि महापारेषणने केले आहे.