पिंपरी : लंडनवरून पुण्यात एका लग्नासाठी येत असलेल्या संगणक अभियंत्याच्या सामानातून सात लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास झाले. हा प्रकार ९ ते ११ डिसेंबर २०२३ या कालावधीत लंडन ते पुणे या दरम्यान घडला. सचिन हरी कामत (वय ४४, रा. वाकड, मूळ लंडन) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कामत हे संगणक अभियंता आहेत. ते लंडन येथे एका संगणक कंपनीत नोकरीला आहेत. पुण्यात एका नातेवाइकाच्या लग्नासाठी ते येत होते.

हेही वाचा >>> आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयाजवळ मोठी चोरी; सराफी पेढीतून तीन कोटी ३२ लाखांचा ऐवज लंपास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लंडन ते मुंबई ते जेट्टी असे विमान प्रवासाने ते निघाले. लंडन येथून निघताना त्यांनी त्यांच्या सामानाच्या चार पिशव्या सीलबंद न करता सौदिया एअरलाईन्सकडे दिल्या. त्या चार पिशव्यांमध्ये त्यांनी कपडे, अत्तर, चॉकलेट, इलेक्ट्रिक उपकरणे आणि १५२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ठेवले होते. कामत हे मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांना त्यांच्या पिशव्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी पिशव्यांचे ओळखपत्र मुंबई विमानतळ येथे जमा केले. त्यानंतर एका कुरिअर कंपनीद्वारे त्यांना त्यांच्या पिशव्या वाकड येथे मिळाल्या. त्यांनी पिशव्या तपासून पाहिल्या असता, त्यात त्यांचे सात लाख ६० हजारांचे दागिने आढळून आले नाहीत. त्याबाबत त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. फौजदार माने तपास करीत आहेत.