सराईतांच्या विरोधात गुन्हा दाखल
नगर रस्त्यावरील खराडी भागात वैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. परस्परविरोधी तक्रारीनुसार दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुहास गवळी (वय २९, येरवडा) याने या संदर्भात चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी आरबाज जैनुद्दीन नदाफ (वय २५), हैदर मोहम्मद नदाफ (वय ५२, दोघे रा. आपले घर सोसायटी, खराडी) यांना अटक करण्यात आली. सुहास गवळी यांचा भाऊ रोहित (वय ३२) याचा आरोपी नदाफ आणि साथीदारांशी वाद झाला होता. या कारणावरुन नदाफ आणि साथीदारांनी रोहित यांच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत रोहित जखमी झाला असून पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सुलतान नदाफ (वय २५, रा. खराडी) याने परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदाफ आणि त्याचा चुलत भाऊ खराडी भागातील एका उपहारगृहात चहा प्यायला गेले होते. त्या वेळी रोहित गवळी साथीदारांसह सहाआसनी रिक्षातून तेथे आला. त्याने सुलतान नदाफ याच्यावर कोयत्याने वार केला. सहायक पोलीस निरीक्षक एम. पी. सोनवणे तपास करत आहेत.