पुणे : मंगळवार पेठेतील काची वस्तीत असलेल्या एका घराला सोमवारी दुपारी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आगीत गृहोपयोगी साहित्य जळाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

मंगळवार पेठेतील एसएसपीएम प्रशालेच्या पाठीमागील बाजूस काची वस्ती आहे. या वसाहतीत बैठी पत्र्यांची घरे आहे. सोमवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास घरातून मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. घरात चव्हाण कुटुंबीय राहायला आहेत. घरात कोणी नव्हते. चव्हाण यांची आजी घराबाहेर बसल्या होत्या. वस्तीतील रहिवाशांनी काही अंतरावर असलेल्या अग्निशमन दलाच्या नायडू केंद्रात या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचा बंब दोन मिनिटात तेथे पोहोचला.

हेही वाचा >>>भरधाव बसची पादचारी ज्येष्ठ दाम्पत्याला धडक, बसच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अग्निशमन दलाचे तांडेल रऊफ शेख, गणेश पराते, वैष्णव गाडे, दीपक क्षीरसागर, हिरामण मोरे यांनी पाण्याचा मारा करुन आग आटेक्यात आणली. जवानांनी पाच मिनिटात आग आटोक्यात आणली. घरात कोणी नसल्याने दुर्घटना टळली. आगीत गृहोपयोगी साहित्य आणि छताचे पत्रे जळाले. जवानांनी घरातून एक छोटा सिलिंडर बाहेर काढला. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलातील तांडेल रऊफ शेख यांनी दिली.