Premium

पिंपरी: कर्मचाऱ्याला नोटीस दिल्याने भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीची सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण

ही घटना भोसरीतील ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात घडली.

Former BJP corporator's husband beats up assistant health officer giving notice employee pimpri pune
कर्मचाऱ्याला नोटीस दिल्याने भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीची सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण (प्रातिनिधिक छायाचित्र)

पिंपरी: विनापरवाना गैरहजर आणि उद्धट वर्तनाबाबत कर्मचाऱ्याला नोटीस दिल्याने भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीने महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण केली. ही घटना भोसरीतील ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याप्रकरणी राजेश नंदलाल भाट (वय ५४, रा. थेरगाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शंकर मुरलीधर सोनवणे (वय ३२, रा. बोपखेल गावठाण) आणि संतोष लांडगे (वय ४५) यांच्यासह आणखी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा… धक्कादायक! चेष्टा मस्करी जीवावर बेतली; काॅम्प्रेसर पाइपमधील हवा पोटात सोडल्याने १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

फिर्यादी भाट हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांनी शंकर सोनवणे यास विनापरवाना गैरहजर आणि उद्धट वर्तनाबाबत नोटीस बजावली होती. त्या कारणावरून त्याने इतर साथीदारांना घेऊन येत भाट यांना शिवीगाळ केली. मारहाण करण्यासाठी अंगावर धावून आले. अनोळखी व्यक्तीने भाट यांच्या कानशिलात लगावली.

भाट यांना मारहाण करत त्यांच्या कार्यालयात ओढून नेले. शंकर सोनवणे यांनी तुझ्या नावाने आत्महत्या करून तुझी नोकरी घालवतो अशी धमकी दिली. फिर्यादी शासकीय काम करत असताना आरोपींनी त्यांना अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संतोष लांडगे हे भाजपच्या माजी नगरसेविका सारिका लांडगे यांचे पती आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former bjp corporators husband beats up assistant health officer for giving notice to employee in pimpri pune print news ggy 03 dvr

First published on: 06-12-2023 at 14:07 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा