पुणे : हडपसर भागात चार वर्षांच्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. बालिकेवर अत्याचार करुन पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

याबाबत बालिकेच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेची चार वर्षांची मुलगी घरासमोर खेळत होती. त्यावेळी तेथे एक २० ते २२ वर्षांचा तरुण आला. त्याने बालिकेला खाऊचे आमिष दाखविले. घरापासून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या जागेतील पत्र्याच्या खोलीत बालिकेला नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे राहणाऱ्या एका तरुणाने बालिकेचा रडण्याचा आवाज ऐकला.

हेही वाचा…मावळमध्येही ‘वंचित’चा उमेदवार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुण तेथे गेला. तरुण आल्याचे पाहून आरोपी बालिकेला तेथे सोडून पसार झाला. या घटनेची माहिती हडपसर पोलिसांनी कळविण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे तपास करत आहेत.