पिंपरी : मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एकाला तुम्ही दर्शन घेऊ शकत नाही, असे म्हणत १४ जणांनी मिळून मारहाण केली. ही घटना क्षत्रिय घांची समाज मंदिराजवळ रहाटणी येथे घडली.

प्रकाश रूपचंद सोळंकी (वय ३५, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रकाश सरेश परिहार, रमेश गेहलोत, भवरलाल परिहार, दुर्गाराम परमार, जगदीश परिहार, जीवाराम परिहार, मनोज भाटी, मगनलाल भाटी, रमेश नकूम, दलपत भाटी, दौलाराम परिहार, प्रवीण राठोड, विशाल भाटी, महेंद्र राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील ‘या’ मुख्य सूत्रधाराने केला अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिर्यादी प्रकाश आणि आरोपी यांच्यात समाजाच्या चारभुजा मंदिरावरून बर्‍याच दिवसांपासून वाद आहेत. न्यायालयापर्यंत हे वाद पोहोचले आहेत. २२ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास फिर्यादी सोळंकी हे रहाटणी येथील क्षत्रिय घांची समाज मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी प्रकाश परिहार याने तुमच्यासाठी या मंदिरात दर्शन बंद आहे. तुम्ही दर्शन घेऊ शकत नाही, असे म्हणून फिर्यादी सोळंकी यांच्या शर्टची कॉलर पकडली. त्यांना खाली पाडून त्याच्याबरोबर असलेल्या अन्य आरोपींनी सोळंकी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फौजदार जाधव तपास करीत आहेत.