पुण्यात व्यापाऱ्याला लुटण्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी जेरबंद ; भवानी पेठेत गुन्हे शाखेची कारवाई | Gang of thieves preparing rob businessman in Pune jailed Action of crime branch Bhawani Peth pune | Loksatta

पुण्यात व्यापाऱ्याला लुटण्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी जेरबंद ; भवानी पेठेत गुन्हे शाखेची कारवाई

पोलिसांनी आरोपींकडून दोन कोयते, मिरची पूड, दांडके असा मुद्देमाल जप्त केला.

पुण्यात व्यापाऱ्याला लुटण्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी जेरबंद ; भवानी पेठेत गुन्हे शाखेची कारवाई
( संग्रहित छायचित्र )

पुणे : भवानी पेठेतील एका व्यापाऱ्याकडील रोकड लुटण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने जेरबंद केले. आमान समीर शेख (वय २२), अमीर समीर शेख (वय २०), अमोल अनिल अंबवणे (वय २०), शाहरुख दाऊद सय्यद (वय २६), सादिक अमीर शेख (वय २५, सर्व रा. कासेवाडी, भवानी पेठ) असी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. भवानी पेठेतील एक व्यापारी दररोज रात्री दुकानात जमा झालेली रोकड घेऊन घरी जात असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. आरोपींनी त्याच्यावर पाळत ठेवली होती.

हेही वाचा : पुणे : अतिवृष्टी बाधितांसाठी तीन कोटी १८ लाखांचा निधी प्राप्त

नवरात्रोत्सवानिमित्त गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाकडून श्री भवानी माता मंदिर परिसरात गस्त घालण्यात येत होते. त्या वेळी आरोपी भवानी पेठेतील एका उद्यानाजवळ थांबले असून ते व्यापाऱ्याकडील रोकड लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून पाच आरोपींना पकडले. त्याच्याकडून दोन कोयते, मिरची पूड, दांडके असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, अजय जाधव, अमोल पवार, इम्रान शेख, अजय थोरात, अय्याज दड्डीकर, महेश बामगुडे

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : सदनिकांच्या विक्री करारनाम्यांच्या नोंदी आता सुलभ ; दोन वर्षांत सात हजार सदनिकांची नोंद

संबंधित बातम्या

रुळाचा आवाज हेरून त्याने टाळली रेल्वेची मोठी दुर्घटना; पुणे विभागातील रेल्वे चालकाचा मध्य रेल्वेकडून गौरव
पुणे: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाची अधिसूचना १५ दिवसांत निघेल; माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची माहिती
फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय
पुणे: भूमी अभिलेख भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरला; यंदा प्रथमच प्रतीक्षा यादी
कोथरुडमधील गुंड शरद मोहोळ तडीपार

व्हिडिओ

ताज्या बातम्या
BBL 2022-23: अ‍ॅडम झाम्पा मेलबर्न स्टार्सचा नवा कर्णधार; तर उपकर्णधार म्हणून ‘या’ खेळाडूची लागली वर्णी
“नागपूर-हैदराबादला जोडणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू करा”, मुनगंटीवारांची केंद्र सरकारकडे मागणी
“विचार आणि विश्वास…” मुलगा आर्यनच्या बॉलिवूड पदार्पणावर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया
“हिंदीत कितीही मोठं काम केलं तरी…” स्वप्निल जोशीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
IND vs BAN 2nd ODI: ‘अरे देवा! सांगा यांना कोणीतरी…’ आयसीसीची मोठी चूक, सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी केले ट्रोल