कोथरूडमध्ये करिश्मा सोसायटीतील सातव्या मजल्याच्या बाल्कनीमधून 3 वर्षीची चिमुरडी पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड कर्वे रोडवरील करिश्मा सोसायटीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये अभिजीत पाटील आपल्या पत्नी आणि दोन मुलीसह राहत होते. निकिता ही त्यांची लहान मुलगी होती. अभिजीत व त्यांची पत्नी दोघेही आयटी कंपनीत कामाला असून आज सकाळी अभिजित यांची पत्नी कामावर गेली होती. त्यानंतर मोठ्या मुलीच्या शाळेची वेळ झाल्याने अभिजीत हे तिला बसमध्ये सोडायला गेले होते. यावेळी निकिता अभिजीत पाटील वय ३ ही घरात एकटी होती. घरात एकटी असल्याने निकिता आई-बाबांना शोधता घराच्या बाल्कनीत आली. यावेळी बाल्कनीतून पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने सोसायटी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Mar 2017 रोजी प्रकाशित
सातव्या मजल्यावरून पडून ३ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
आई-बाबा घरात नाही असे पाहून चिमुरडी बाल्कनीमध्ये आली आणि पडली

First published on: 09-03-2017 at 17:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl fall down from seventh floor kothrud incident