आजी-माजी कुस्तीगिरांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, कुस्तीगिरांना आरोग्य सुविधा, सन्मानजनक मानधन, निवृत्तीवेतन व अन्य सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ,”असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी पाटील बोलत होते.

हेही वाचा- पुण्यातील स्वीकृत नगरसेवकांची संख्या दहावर

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, अभिनेत्री दीपाली सय्यद आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, कार्यक्रमाचे आयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी मंत्री बाळासाहेब भेगडे, अभिनेत्री दिली सय्यद, अभिनेते प्रवीण तरडे तसेच कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वर्गीय वस्ताद दामोदर लक्ष्मण टाकले यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

हेही वाचा- “महाराष्ट्रातील मल्लांच्या मागण्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी मान्य होतील”; चंद्रकांत पाटलांचे आश्वासन

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुरलीधर मोहोळ यांच्या कल्पनेतून भव्यदिव्य स्वरूपाचे हे आयोजन झाले आहे. आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत. जेणेकरून कुस्ती न खेळणाऱ्यांनाही कुस्ती खेळण्याचा मोह होईल. खेळाडूंची सर्व व्यवस्था चोखपणे केली आहे. १४ तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कुस्तीगिरांसाठी चांगल्या घोषणा करतील, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- ‘टोमणे मारण्याऐवजी तोंड बंद ठेवावे’; चंद्रशेखर बावनकुळे यांची संजय राऊत यांच्यावर टीका

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर स्पर्धेतील विजेत्या खेकाडूंच्या मानधनात भरघोस वाढ करण्यासाठी शासनाकडे पाठपूरावा करणार आहे. अशा स्पर्धांमुळे मोबाईल, इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांना अशा पद्धतीच्या आयोजनामुळे खेळाकडे आकर्षित करू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.