पुणे : आडकर फाउंडेशनच्या वतीने ऑल इंडिया ब्लाईंड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी वाघ यांना डॉ. हेलन केलर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे शुक्रवारी (२७ जून) सकाळी अकरा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते वाघ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाईंडचे राष्ट्रीय सल्लागार दिलीप शेलवंते यांची उपस्थिती असणार आहे. उत्तरार्धात ‘अंधारातून प्रकाशकाकडे’ या विषयावर कविसंमेलन होणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे दिली.